JW subtitle extractor

येशू ख्रिस्ताच्या बलिदानाची आठवण ठेवा

Video Other languages Share text Share link Show times

अशा एका जगाची कल्पना करा, जिथं शांती असेल. . .
कोणतंही दुःख नसेल. . .
सर्वांसाठी भरपूर अन्न. . .
. . .आणि परिपूर्ण आरोग्यदेखील असेल.
असं सुंदर भवितव्य मिळणं खरंच शक्य आहे का?
येशूने दिलेल्या बलिदानामुळं ते शक्य आहे.
एका खास उद्देशानं तो या पृथ्वीवर आला.
त्याचं ज्यांच्यावर प्रेम होतं, त्यांच्यासाठी त्यानं आपला प्राण दिला.
मरणाच्या आदल्या रात्री येशूनं आपल्या सर्वांना आज्ञा दिली की,
त्याच्या बलिदानाची आठवण म्हणून आपण त्याच्या मृत्यूचा स्मारकविधी साजरा करावा.
त्यानं म्हटलं: “माझ्या स्मरणार्थ हे करा.”
प्रत्येक वर्षाप्रमाणे या वर्षीदेखील जगभरात अनेक लोक
या स्मारकविधीसाठी एकत्र येतील.
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला या स्मारकविधीसाठी यहोवाचे साक्षीदार आमंत्रण देत आहेत.
येशूनं दिलेलं बलिदान इतकं महत्त्वाचं का आहे, आणि त्याच्या अभिवचनांचा
तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो, याचं उत्तर तुम्हाला मिळेल.
तुम्हाला जवळ असलेलं ठिकाण शोधण्यासाठी, यहोवाच्या साक्षीदारांकडून
आमंत्रणपत्रिका स्वीकारा, किंवा आमच्या सभा कुठे भरतात
हे पाहण्यासाठी jw.org वर फॉर्म भरा.